ढाकणवाडीत महिलेच्या घरावर दगडफेक करत केली मारहाण केज पोलिसांकडून कारवाई शून्य

केज पोलिसांचा नाकारते पुन्हा एकदा उघड 

ढाकणवाडीत महिलेच्या घरावर दगडफेक करत केली मारहाण केज पोलिसांकडून कारवाई शून्य 

 बीड प्रतिनिधी - केज तालुक्यातील ढाकणवाडी, तालुका केज, जिल्हा बीड येथील विधवा महिला लता तुकाराम ढाकणे यांच्या घरावर दगडफेक करून मारहाण करण्यात आली. दगडफेक करणारे गावातील शेजारचे लोक होते. ही माहिती पोलिसांना फोनवर दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करणा अपेक्षित होतं परंतु पण ते केज पोलीस कधीच वेळेवर येत नाहीत. व कारवाई करत नाही. त्यामुळे थेट त्या विधवा महिलेने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनत कॉवत यांच्याकडे धाव घेतली. झालेला अन्याय दूर करण्याची अपेक्षा व्यक्त ज्यांनी घरावर दगडफेक केली मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी देखील केली आहे. केज तालुक्यातील ढाकणवाडी येथे एक विधवा महिला लता तुकाराम ढाकणे ह्या रहिवासी आहेत. त्यांची ढाकणवाडी येथे थोडी शेती आहे. शेतीवर भागत नाही, त्यांचा मुलगा कृष्णा तुकाराम ढाकणे या मारहाणी व दगडफेकी मुळे भीतीपोटी अनेक दिवसापासून गाव सोडले आहे. मुलगा बाहेरगावी कामाला असतो. शेजारील भावकीतील लोक त्यामध्ये नारायण संपत ढाकणे, संपत त्रंबक ढाकणे, गोकुळ काशिनाथ ढाकणे, विभीषण काशिनाथ ढाकणे, गोकुळ मनोहर हांगे, उत्तरेश्वर भीमराव हांगे, अभिमान रमेश भांगे, आसराबाई रमेश भांगे, निर्गुणा अभिमान भांगे, शितल उत्तरेश्वर हांगे, सोनाली संपत ढाकणे, चंद्रकला सुभाष ढाकणे, कुसुम भीषण ढाकणे, दिपाली गोकुळ ढाकणे, भागाबाई काशिनाथ ढाकणे, हे सर्वजण जाणीवपूर्वक या विधवा महिला शेतकरी यांना त्रास देत आहेत.शेजारचे लोके भावकितीला असल्याने एकट्या लताबाई तुकाराम ढाकणे यांना त्रास देत आहेत, शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान, झाडाचे नुकसान करणे, पाईपलाईट फोडणे असा मानसिक त्रास देणे सातत्याने दर दिवस सुरू आहे. शेतात केलेल्या पाईपलाईन तोडफोड व पिकाचे नुकसान भरपाई देखील देण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. केज पोलीस स्टेशन येथे अनेकवेळा तक्रार देऊन ही कारवाई केली गेली नाही.

  10 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन च्या दरम्यान त्या घरीच होत्या त्यांच्या भावकीतील नारायण संपत ढाकणे याने घरावर तुफान दगडफेक केली. त्यामुळे त्यांनी भीतीपोटी घराचा दरवाजा बंद केला व आत मधून पोलिसांना फोन केला. ते केज पोलीस त्यांनी कसल्या प्रकारचे उत्तर दिले नाही. या प्रकरणी भेटही दिली नाही कारवाई करणे तर दूरच म्हणून थेट बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन झालेल्या अन्य अत्याचार व दगडफेकीची हकीकत सविस्तरपणे सांगितली. व ती एस पी यांनी ऐकूनही घेतली.त्यांनी बीड च्या एसपी यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जर न्याय न मिळाला तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचे सांगितले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी