शिक्षण विभागाला जागा करण्यासाठी कार्यालयासमोर "जागरण गोंधळ"आंदोलन करणार-वर्षाताई जगदाळे



२५ जानेवारी पासून शिक्षण विभाग कार्यालयासमोर एक महीला आमरण उपोषणास बसल्या मात्र अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष !

बीड प्रतिनीधी 

मिल्लीया माध्यमिक शाळेतील अन्यायाविरोधात रहेमत बेगम अजमत उल्लाह खान या मागील अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून त्या जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिक्षण विभागाला इशारा दिला आहे. दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मनसेतर्फे शिक्षण विभाग कार्यालयासमोर "जागरण गोंधळ" आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी दिला आहे.

रहेमत बेगम या Diabetes आणि Blood Pressure सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असताना देखील, प्रशासनाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेतलेली नाही. मिल्लिय शाळेशी संबंधित या प्रकरणाचा वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.मनसेने प्रशासनाला कडक शब्दांत इशारा देत म्हटले आहे की, राज्य माहिती आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर पुढील सर्व परिणामांना शिक्षण विभाग जबाबदार राहील.आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि मनसे आंदोलनाची पुढील दिशा काय असेल?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी