वंचित घटकांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्वाची संधी म्हणजे आरक्षण - संजय मस्के

  

 महामानव अभिवादन ग्रुप व महामानव सार्वजनिक वाचनालय यांचा संयुक्त विद्यमाने निवड व नियुक्ती झालेल्यांचा सत्कार

 बीड प्रतिनिधी - प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित व बहुजन समाजाकरिता, देशहिता करिता घेतलेले अपार कष्ट व माता रमाईचा त्याग न विसरता आपण लोकसेवक आहोत याचे भान नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी सदैव ठेवावे व जिद्द चिकाटी व सर्व महामानवांच्या आदर्श विचारा नुसार वर्तन यशाकडे घेऊन जाते असे उद्गार अध्यक्षपदी लाभलेले जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी काढले.
महामानव अभिवादन ग्रुप व महामानव सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमानेमाने धानोरा रोड बीड येथे एम.पी.एस.सी. तर्फे निवड झालेल्या व वैद्यकीय अधिकारी सेवेत रुजू झालेल्या अशा 9 जणांचा सत्कार समारंभ आयोजित प्रसंगी पि.व्ही बनसोडे, शहाजी पारवे, सुरेश साबळे, उत्तमराव पवार, दयानंद सरपते विचार मंचाचावर उपस्थित होते.
 प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव अभिवादन ग्रुपचे 
  डी.जी.वानखेडे, प्रशांत वासनीक,यु.एस.वाघमारे अँड.तेजस वडमारे, दशरथ मकासरे, बि.डी. तांगडे, अर्जुन जंजाळ,सुजाता वासनिक हे उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक जी.एम. भोले यांनी करून महामानव अभिवादन ग्रुपच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमाबद्दल माहिती दिली. बहारदार सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी केले. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व सर्व आदर्श महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प, पुष्पमाला वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महसूल सहायक पदी निवड झालेल्या मयुरी तुरुकमारे, सोनिया ससाने, प्राजक्ता तांगडे, प्रमिमा साळवे, राधा डोळस, रेणुका दळवी (आरोग्य सेविका) शैलेश जोगदंड, गौरव साळवे, डॉ. विशाल तांगडे यांचा त्यागमूर्ती माता रमाई यांचे जीवन चरित्र पुस्तक व पेन पुष्पगुच्छ शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते हृदयी सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतात राधा डोळस म्हणाली की अत्यंत गरीब परिस्थिती असताना आई-वडिलांनी उच्च शिक्षणाकरिता बाहेरगावी पाठवले. त्यांचे कष्ट सतत डोळ्यासमोर ठेवून व माता रमाईचा बाबासाहेबांच्या व समाजाकरिता त्याग आठवून आपले ध्येय प्राप्त करण्याकरता कितीही त्रास झाला तरी अपयश हे यशाची पहिली पायरी आहे हे थोरा चे मनात उद्गार बिंबवून एम.पी.एस.सी.मार्फत सेवेत रुजू होत आहे हे सांगताना तिचा कंठ दाटून आला. तर शैलेश जोगदंड यांनी आपल्या प्रभावी मनोगतात स्पष्ट केले की सर्वच निवड झालेल्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. परंतु शिक्षण हे असे एक शस्त्र आहे, ते जीवनातील सर्वच कठीण प्रश्न सोडवण्यास जीवनभर मदत करते.
 प्रमुख पाहुणे दयानंद सरपते म्हणाले की प्रशासकीय सेवेत स्वाभिमानाने लोकसेवा करून दिलेल्या विभागातील कामांची इतंबूत माहिती घेऊन कोणाच्याही दबावाखाली न येता चुकीचे काम करू नये असे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. सेवानिवृत्त पी.आय. शहाजी पारवे यांनी देखील सरकारी सेवा करत असताना अनेक अडचणी येतात परंतु नियमांचे पालन करून वंचित, अन्यायग्रस्तांना मदत करून आपण समाजाचे काही देणे लागतो हा बहूमोल विचार सतत समोर ठेवून महसूल सहाय्यक या पदाच्याही पुढील पदे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा. प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त सिओ बनसोडे पीव्ही यांनी स्पष्ट केले की संविधानाला अपेक्षित असलेले, हया आजच्या 9 सत्कारमूर्ती पैकी 6 मुली आहेत याचा अर्थ स्त्रियांना रूढी परंपरेने नाकारलेल्या प्रगतीची द्वारे खुली करणाऱ्या सावित्रीच्या ह्या लेखी कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकतात हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्री पुरुष लिंगभेद न करता त्यांना समान संधी देण्याच्या संविधानातील तरतुद किती . दूरदृष्टीची व बहुमोलाची आहे हे दिसून येते.

 कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष सत्कार मूर्तीचे पालक व महामानव अभिवादन ग्रुपचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.अशोक गायकवाड यांनी केले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी