बालेपिर गोरे वस्ती खदिजा नगर परिसरात भीषण पाणी टंचाई - शेख निसार
एक ते दीड महिन्यापासून पाणी पुरवठा नाही
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
बीड दि -24 प्रतिनिधी
बीड शहरातील शहरातील बालेपिर परिसर मोठी लोक संख्या असलेला भाग या भागात मोल मजुरी करून आयुष्याची उपजीविका भागवणारे नागरिक मोठ्या संख्यने वास्तव्यास आहेत.
दैनंदिन जीवनातील मूलभूत सुविधांसाठी नेहमीच मुकलेला हा परिसर आहे मात्र नगरपालिका प्रशासना द्वारे नेहमीच दुर्लक्षित राहिल्याने या परिसराला सतत पाणी टंचाई चा सामना सातत्याने करावा लागत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आता पासूनच उकाडा जाणवू लागल्याने पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे अशातच गेल्या एक ते दीड महिन्यापासून या भागाला पाणी पुरवठा केला गेला नाहीं.एकीकडे निवडणुका आल्या ही सर्व पक्षातील नेते मंडळींचा ओघ हा या भागाकडे दिसतो मात्र निवडणुका संपल्या की या भागातील समस्यांकडे पाठ फिरवली जाते गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाण्या साठी या भागातील महिला भगिनी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत तरी मात्र प्रशासनाला याची जाणिव नाही उन्हाळा तो तोंडावर आहे येत्या महिन्यात पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे या महिन्यात मुस्लिम बांधव उपास करतात आणि पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते म्हणून
येत्या तीन चार दिवसात बालेपिर भागातील गोरे वस्ती, खतीजा नगर तसेच आजू बाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करण्यात यावा जेणे करून गेल्या एक दीड महिन्यापासून सुरू असलेली पाण्याची गरज तूर्तास मिटेल आणि पुढील.काळात आठ दिवसाला पाणी पुरवठा नियमित करण्यात यावा नसता या भागातील नागरिकांना सोबत घेवून आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करत प्रशासनाला जागं आणून द्यावी लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख निसार,यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment