शिवजन्मोत्सवनिमित्त लिंबागणेश येथे शिवरायांच्या शुर शिलेदारांना छायाचित्रांसह फलकाद्वारे मानवंदना
लिंबागणेश:- ( दि.१९ ) बीड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती लिंबागणेश यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुर शिलेदारांना मानवंदना देत इतिहासाच्या पानांवरती माहिती दुर्मिळ असलेल्या कर्तृत्ववान शुरवीर मावळ्यांची व शिलेदारांचा जाज्वल्य इतिहास यावर्षी शिवतीर्थ याठिकाणी फलकाद्वारे लावण्यात आला आहे.या आदर्श उपक्रमामुळे दुर्मिळ ईतिहासाची माहिती छायाचित्रांसह सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचत आहे.शिवरायांच्या शुरवीर मावळ्यांमध्ये नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे, वीरबाजी पासलकर, सरनौबत येसाजी कंक,शिवरत्न जिवाजी महाले, गुप्तहेर बहिर्जी नाईक शिव रक्षक संभाजी कावजी स्वराज्याचे पहिले सेनापती बाजी पासलकर वीर योद्धा शेलार मामा निष्ठावंत मावळा सिद्धी हिलाल,अशा शुरवीर शौर्य गाजवलेल्या मावळ्यांची छायाचित्रासह माहिती फलकाद्वारे देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment