आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांच्याकडून गरजू शिव सैनिक रुग्णाला एक लाखाची रोख मदत

.


तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी गरजू शिव सैनिक रुग्णाला बाजीराव (दादा) चव्हाण यांनी एक लाख रोख मदत देऊन माणसातल्या देव माणसाची पुन्हा : जाणीव करून दिली आहे.



बीड प्रतिनिधी : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या विचाराचा वारसा घेऊन आरोग्यदूत बाजीराव (दादा) चव्हाण हे वेळोवेळी महाराष्ट्रातील गरजू रुग्णांच्या हाकेला धावून रुग्णसेवेसह युवा सेनेचे काम महाराष्ट्रभर करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरातून गरजू रुग्ण वैद्यकीय मदतीकरता बाजीराव चव्हाण यांच्या बीड येथील कार्यालयात येत असतात. असाच एक प्रत्येय बीड मधील एका शिवसैनिक असलेल्या रुग्णांच्या संबंधित दिसून आला. शिवसैनिक असलेले बाबा सोनवणे यांना त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ एक लाखाची गरज लागत होती. तेव्हा रुग्ण शिवसैनिक बाबा सोनवणे यांनी आरोग्यदूत युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव (दादा) चव्हाण हे परळी वैजनाथ येथील युवासेना विजय दौरा टप्पा दुसरा कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा शिव सैनिक सोनवणे यांनी आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांची भेट घेऊन. आपल्या वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय निधी लागत असल्याचे सांगितले. तेव्हा लगेच क्षणाचाही विलंब न करता आरोग्यदूत बाजीराव चव्हाण यांनी गरजू शिवसैनिक असलेले रुग्ण बाबा सोनवणे यांच्या उपचारकारता रोख एक लाखाची मदत देऊन पुन्हा : एकदा माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे. गरजू रुग्ण मूळचे शिवसैनिक असलेले बाबा सोनवणे यांना वैद्यकीय उपचारासाठी एक लाखाची तत्काळ रोख स्वरूपात मदत करुन शिवसैनिकांच्या पाठीशी पक्ष नेतृत्व खंबीर पणे उभे असल्याची जाणीव आरोग्यदूत बाजीराव (दादा) चव्हाण यांनी परत एकदा करून दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले मा. एकनाथ शिंदे यांचे अगदी विश्वासू असलेले बाजीराव चव्हाण यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातील गरजू रुग्णांच्या अडचणीकाळी धावून जाऊन त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मदत रुपी उभे राहून माणसातल्या देवाचे दर्शन घडवून दिले आहे. त्यामुळे आरोग्यदूत बाजीराव (दादा) चव्हाण यांचे सर्व स्तरावरून त्यांच्या या आरोग्य सेवेचे महाराष्ट्र भरातून कौतुक केले जात आहे. यावेळी उपस्थित युवा सेनेचे युवासेना मराठवाडा सचिव निलेशजी शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव (दादा) चव्हाण, मराठवाडा युवती निरीक्षक आकांक्षा चौगुले, युवासेना जिल्हा प्रमुख सुजित शिंदे, रविराज बडे, शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, उपजिल्हा प्रमुख राजा भैय्या पांडे, शहर प्रमुख वैजनाथ माने, व मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील शेकडो युवासैनिक यावेळी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी