आदर्श शिक्षक शामराव थोरात गुरुजींच्या जीवनकार्यवर गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

 

केज । प्रतिनिधी

केज तालुक्यातील मौजे मांगवडगाव येथील रहिवाशी असणारे शामराव थोरात गुरुजी हे समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांचे योगदान विशेषतः ग्रामीण शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय राहिले आहे.त्यांनी नालंदा शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाच्या प्रसारासाठी काम केले आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने त्यांनी कार्यरत राहून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. राजकीय स्तरावरही त्यांनी समाजहितासाठी योगदान दिले.अशा थोर व्यक्तिमत्त्वाच्या जीवनकार्यावर गौरव ग्रंथ प्रकाशित होत असेल, तर ते एक महत्त्वाचे दस्तऐवजीकरण ठरेल. 
या बाबत सविस्तर माहिती अशी कि कालकथित शामराव थोरात गुरुजी यांच्या जीवनावर प्रकाश टाळण्यासाठी गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक मुजमुले सचिव डॉ. ओमप्रकाश नायर व ॲड सचिन थोरात यांनी पुढाकार घेऊन गौरव ग्रंथ प्रकाशीत करण्याचे ठरवले आहे . दिनांक २ मार्च २०२५ वार रविवार रोजी फुलेनगर येथील जे.के. फंक्शन हॉल येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून सदरील प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहान आयोजकाकुन करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी