राजमुद्रा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बबलु भैय्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

राजमुद्रा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बबलु भैय्या शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


 गेल्या 11 वर्षापासून राजमुद्रा संघटनेचे बबलू भैय्या शिंदे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रुग्ण सेवा करत आहेत.


 प्रतिनिधी बीड

सदैव सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे व सर्व सामान्यांच्या अडी अडचणी वेळी हाकेला धावून जाणारे तसेच राजमुद्रा सामाजिक संघटना मराठवाडा अध्यक्ष दिलदार व्यक्तीमत्व असणारे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले युवा नेते बबलु भैया शिंदे याच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01/03/2025 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राजमुद्रा सामाजिक संघटना मार्फत बीड येथील कार्यालय, अंबिका चौक, पांगरी रोड, बीड येथे आयोजित केला आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा
सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बीड शहरात विविध सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रम, अनाथ बालकांना पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम आयोजित केले आहे. या सामाजिक उपक्रमात मराठवाड्यातील तसेच बीड जिल्ह्यातील राजमुद्रा सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवानेते बबलु भैया शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले युवा वर्ग या रक्तदान शिबीरात शेकडोच्या संख्येने हजर राहून या रक्तदान शिबारात आपले भरीव योगदान देणार आहेत. तसेच युवानेते बबलु (भैय्या) शिंदे हे दरवर्षी प्रमाणे आपल्या वाढदिवस दीवशी रक्तदान करुन आपल्या मित्र मंडळींनाही रक्तदान करण्यासाठी आवर्जुन प्रेरीत करुन
समाजाला रक्तदान महादान हा संदेश देण्याच काम ते आपल्या वाढदिवस दीवशी करणार आहेत. युवानेते बबलु (भैय्या) शिंदे हे रक्तदान शिबिराचा उपक्रम बीड शहरातील शाहूनगर येथील सर्व मित्र मंडळींना सोबत घेऊन गेल्या अकरा वर्षांपासून मनोभावे रक्तदान शिबिरातून जनतेसाठी ही रुग्ण सेवा करत आहेत. त्यामुळे यानिमित्ताने दिनांक 01/03/2025 रोजी बबलु भैय्या शिंदे यांचा वाढदिवस असुन. यादिवशी या होणाऱ्या भव्य रक्तदान शिबिरात बीड शहरातील तरुण वर्गांनी मोठया संख्येने या रक्तदान शिबीरात आपला सहभाग नोंदवून बबलु भैय्या शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येयचे आहे. असे आवाहन राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक, बीड जिल्ह्यातील लाखो युवकांचे नेते आणि प्रेरणा स्थान सलेले किशोर आप्पा पिंगळे साहेब यांनी केले आहे.



 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी