शिवजयंती निमित्त शिवसंग्रामच्या वतीने "छावा" चित्रपटाचे २५ फेब्रुवारी रोजी विशेष मोफत आयोजन.
महिला , विद्यार्थी , आणि शिवसंग्राम पदाधिकारी यांच्यासाठी खास मोफत शो
बीड (प्रतिनिधी)"छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या जयंती निमित्त शिवसंग्राम च्या वतीने महिला , विद्यार्थी आणि शिवसंग्राम पदाधिकारी यांच्यासाठी शौर्य आणि धैर्याचे मूर्तीमंत प्रतीक छत्रपती संभाजी राजांच्या जीवनावर आधारित "छावा" चित्रपटाचे २५ फेब्रुवारी रोजी विशेष मोफत आयोजन. करण्यात आले आहे. असे शिवसंग्राम अध्यक्ष डॉ ज्योती विनायकराव मेटे यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गाजत असलेल्या "छावा" चित्रपटाचे महिला , विद्यार्थी , तरुण आणि शिवसंग्राम पदाधिकारी यांच्यासाठी मोफत शो आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित असून महाराष्ट्रातील शिवभक्तांमधून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले व या भूमीत जन्मलेल्या या दोन्ही महाराजांनी अखंड हिंदुस्तानचा इतिहास रचला आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आणि त्यांचा संघर्ष अनुभवता यावा त्याचबरोबर महिला , विद्यार्थ्यांना संभाजी महाराजांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहता यावा या करिता आपण हा चित्रपट शिवसंग्रामच्या माध्यमातून दाखवणार आहोत असेही ज्योती मेटे यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment