ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरु
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका अध्यक्ष कॉम्रेड-सखाराम पोहिकर
सचिव - काॅम्रेड जावेद सय्यद
गेवराई प्रतिनिधी :-गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासन मान्य प्रलंबित मागण्याची अंमलबजावणी होत नसल्याकारणाने दिनांक-१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणास सुरवात करन्यात आली यासंदर्भात उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सनविनय निवेदन गटविकास अधीकारी पंचायत समिती गेवराई यांना सादर करण्यात आले आहे की आपल्या महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मक पातळीवर काही शासनमान्य मागण्या प्रलंबित असून शासनमान्य बऱ्याच मागण्या जिल्हा तालुका स्तरावर केवळ अंमलबजावणीस्तव प्रलंबित आहेत तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे वेतन ऑफलाइन झाल्या मुळे शाशनाकडुन आलेले मासीक वेतन दोन दोन महीने झाले तरी अद्याप वाटप केले जात नाहीत वेळेवर वेतनाची मागणी केली जात नाही त्या मुळे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे शाशन पत्रका नुसार दिलेल्या तारखेत अद्याप वेतन वाटप तालुका स्तरावुन होत नाही विशेष म्हणजे वारंवार ही बाब निदर्शनास आणून आणि वारंवार पाठ पुरवठा करून सुद्धा त्यास प्रतिसाद मिळत नाही यासंदर्भात शासनाचे जबाबदार अधिकारी म्हणून आपण हस्तक्षेप करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे असे की यापूर्वी आपण समन्वय यासाठी बैठकीचे आयोजन करण्याविषयी पत्र काढण्यात आली मात्र प्रत्यक्षात बैठकाच घेतल्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत म्हणून खालील मागण्यासाठी ना इलाजाने अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अन्नत्याग आमरण उपोषण करण्याची पाळी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पंचायत समिती गेवराई तालुका गटविकास अधिकारी यांनी ही वेळ आणली आहे या उपोषणामध्ये आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत
(१) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत मासिक वेतन त्वरित देण्यात यावे ( २ ) राहणीमान भत्यासहित मासिक वेतन द्या आणि आत्तापर्यंतचा थकीत राहणीमान भत्ता त्वरित अदा करा ( ३ ) भविष्य निर्वाह निधीची वेतनातून कपात केलेली ८.३३% रक्कम अधिक शासन हिस्सा ८.३३% रकमेच्या हिशोबाचा तपशील द्या पावत्या द्या आणि पासबुकच्या नोंदी अध्यावत करा ग्रामपंचायत ८.३३% हिस्सा खात्यात रक्कम जमा करा ( ४ ) पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्या ( ५ ) आकृतीबंध बाहेरील कर्मचाऱ्यांना सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन द्या ( ६ ) सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा ( ७ ) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गटबाजीतून सूडबुद्धेने वागणूक देऊ नका यापूर्वी आपणास वेळोवेळी आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलने व संघटनेद्वारे वेळोवेळी पत्र व्यवहार केला पण या पत्राची आपण दखल घेतली नसून आपल्या कार्यालयास वेळोवेळी धरणे आंदोलने व पत्र व्यवहार केलेला तपशील माहितीस्तव आपणास खालील प्रमाणे देत आहोत दिनांक- १/१२/२०२१ रोजी आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले दुसरे धरणे आंदोलन दि.-१३/०१/२०२२ रोजी करण्यात आले तिसरे धरणे आंदोलन दिनांक ३०/०३/२०२२ रोजी करण्यात आले चौथे धरणे आंदोलन दिनांक २०/१०/२०२२ रोजी करण्यात आले पाचवे अन्नत्याग आमरण उपोषण दिनांक - १२/०८/२०२४ रोजी करण्यात आले या धरणे आंदोलनाची दखल घेऊन आपण संघटनेद्वारे पत्र व्यवहार केला व या सर्व पत्राचा संदर्भ घेऊन
दि.०५/०२/२०२४ रोजी प्रलंबित मागण्याची अंमलबजावणी करणे याबाबत आपणास संघटनेमार्फत पत्र व्यवहार केला परंतु दि.-१५/०७/२०२४ रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निमबाह्य काम सांगणे यासंदर्भात आपणास पत्र दिले असता याबाबत आपल्या कार्यालयाकडून याची अंमलबजावणी करणेबाबत कृपया वरील मागण्याचा संदर्भात आज दिनांक - १३/०२/२०२५ पासून आम्ही आपल्या पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्यात येत आहे या निवेदनाची माहितीस्तव प्रत माननीय- पोलीस निरीक्षक साहेब गेवराई पोलीस स्टेशन तसेच माननीय- आमदार विजयसिंह पंडित साहेब विधानसभा गेवराई यांना देण्यात आले आहे या अन्नत्याग आमरण उपोषणासाठी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष कॉ सखाराम पोहिकर, तालुका सचिव सय्यद जावेद, उपाध्यक्ष काॅम्रेड शरद मोरे, कार्यकारणी सल्लागार काॅम्रेड प्रल्हाद नागरगोजे, सदस्य सातिराम गव्हाणे, बाबासाहेब राठोड़,पठाण अकबर , अनंत अरुण लगड, रावसाहेब गोपीनाथ राठोड, सुदाम लिंबराज मासाळ, इत्यादी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले व या निवेदनाद्वारे अन्नत्याग आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे तेव्हा गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिनांक - १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालय गेवराई ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहुन उपोषणास सुरवात करन्यात आली असे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुका - अध्यक्ष कॉम्रेड-सखाराम पोहिकर, सचिव सय्यद जावेद , उपाध्यक्ष शरद मोरे, कार्यकारणी सल्लागार काॅम्रेड प्रल्हाद नागरगोजे, सदस्य बाबासाहेब राठोड, सातीराम गव्हाणे, सुदाम मासाळ , यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे
Comments
Post a Comment