पाटोद्यात पुन्हा घरफोडी पोलीस यंत्रणा मात्र चोर पकडण्यात अपयशी
शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय जोशी यांची मागणी
पाटोदा (गणेश शेवाळे)पाटोदा शहरातील बामदवाडा येथे चोरट्यांनी रविवारी रात्री तीनच्या सुमारास घराला लावलेले कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश करून चोरी केली अशीच घटना आठ दिवसा पूर्वी पाटोदा शहरात झाली त्याआधीही पाटोदा शहरात चोऱ्यांचे सत्र चालूच आहे यामुळे पाटोदा शहरात भितीचे वातावरण झाले असून पाटोदा पोलीसांना मात्र चोर पकडण्यात अपयशी आहेत पाटोदा शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी ही शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय जोशी यांनी केली आहे
Comments
Post a Comment