दांडीबाहदर अधिकारी यांच्या कार्यालयाचे स्टींग ऑपरेशन करण्यासाठी मनसेचे कैलास दरेकर यांनी मागितली तहसीलदार यांच्याकडे परवानगी


आष्टी (प्रतिनिधी --गोरख मोरे ) :  
 शासनाने प्रत्येक कार्यालयासाठी पाच दिवसांचा आठवडा केला असून , या पाच दिवसांच्या आठवड्यात सुद्धा काही कर्मचारी --अधिकारी पाच दिवस उपस्थित नसतात , ते कुठे असतात हे कुणालाच माहीत नसतं . कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वा. ची वेळ परंतु कोणता कर्मचारी अधिकारी केव्हाही येतात जातात यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होतो . त्यांची छोट छोटी कामं खोळबंतात . तसेच अनेकदा अनेक कार्यालत महापुरुषांच्या जयंती सुद्धा साजरी करण्याची पद्धत नाही , संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना याचं भान रहात नाही , या मुळे आष्टी तालुक्यातील सर्व कार्यालयातील गैरहजर अधिकारी/ कर्मचारी यांच्या कार्यालयावर स्टींग ऑपरेशन करण्याची परवानगी मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी निवेदन देवून आष्टी तहसीलदार यांच्याकडे परवानगी मागितली आहे . मा.तहसिदार कैलास 
दरेकर यांना स्टींग ऑपरेशन करून व्हिडिओ चित्रीकरण करण्याची परवानगी देणार का? याकडे सर्व मतदारसंघाचं लक्ष लागले आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी