जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांचे मिलीया माध्यमिक शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या उपोषणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष
तिसऱ्या दिवशीही महिला कर्मचारी यांचे उपोषण सुरूच
बीड प्रतिनिधी - मिलिया माध्यमिक शाळा येथे जवळपास बारा वर्षाच्या पुढे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यावर स्वतःला नोकरी मिळावी म्हणून 25 जानेवारी 2025 पासून अमर उपोषण करण्याची अली वेळ. मिलिया माध्यमिक शाळेचे या अमर उपोषणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा होत आहे.
रहेमत बेगम अजमत उल्ला खान या महिला कर्मचाऱ्यांनी मिलिया माध्यमिक शाळेत बारा वर्षापेक्षाही जास्त काळ नोकरी केली आहे. फक्त तीनशे रुपये महिना घेऊन फक्त संस्थाचालक या नोकरीवर कायम करतील या अपेक्षेने निमुटपणे रहेमत बेगम ह्या काम करत होत्या. त्याने इमाने इतबारे प्रामाणिकपणे काम केले. ज्यावेळेस पर्मनंट करण्याची वेळ आली त्यावेळेस. मिलिया माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक यांनी संगणमत करून दुसऱ्याच व्यक्तीला त्यांच्या ठिकाणी नोकरी दिली. व त्यांना तुमचे वय जास्त झाले आहे म्हणून काढून टाकले व डावले. तुमच्या मुलीला शाळेवर काम करण्यासाठी पाठवा असे सांगितले मुलीनेही इमाने इतबारे मिलिया माध्यमिक शाळेत काम केले. परंतु संस्थाचालकाच्या स्वार्थी वृत्तीमुळे. रहेमत बेगम यांच्यावर अन्याय झाला, दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेऊन त्यांच्या जागेवर नोकरी बहाल केली. तात्कालीक मुख्याध्यापक व संस्थाचालकाने त्यांचे सर्विस बुक देखील गायब केले आहे. व त्यांचा कुठलाच पुरावा संस्थेत काम केलेला ठेवला नाही. असा आरोप संस्थेवर करण्यात आला. वारंवार विनंती करून देखील काहीही उपयोग झाला नाही.
त्यानंतर मात्र रहेमत बेगम यांनी राज्य माहिती आयोग महाराष्ट्र राज्य खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे रीतसर माहिती मिळावी यासाठी तक्रार दाखल केली. त्यानंतरही मिलिया माध्यमिक शाळेचे संचालक व मुख्याध्यापक सय्यद अब्दुल सत्तार सय्यद अब्दुल जब्बार व सिद्दिकी मोहम्मद इरफान शादुल्ला पि. मोहम्मद गाजियोदिन यांनी अपिलावर अपेक्षित कारवाई केली नाही. व या ठिकाणी कलम 19(6) चा भंग झाला. जिल्हा परिषद बीड शिक्षण अधिकारी यांनी कलम 19 (6) चा भंग झाला आहे. यावर कारवाई करणे अपेक्षित होते मात्र अद्यापही यावर शिक्षण विभागाने कारवाई केली नाही. उलट या ठिकाणचे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी नागनाथ शिंदे उद्धटपणाची भाषा बोलतात, उद्धटपणाची भाषा करत आहेत. नागनाथ शिंदे शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद येथे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांची मिली भागात असल्याने या महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाला आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक यांच्याकडून योग्य ती कारवाई व्हावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून ही महिला उपोषणाला बसली आहे. तात्काळ त्यांच्या मागणीचा विचार केला जावा यासाठी हे उपोषण सुरूच आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Comments
Post a Comment