तहसीलदार गेवराई, मंडळ अधिकारी चकलंबा, तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा - जिल्हाध्यक्ष अजय सरवदे

अबब...! गेवराई तालुक्यात तहसीलदाराने एकाच ठिकाणाहून दिली 25 वेळेस मुरूम उत्खनन परवानगी

तहसीलदार गेवराई, मंडळ अधिकारी चकलंबा, तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा - जिल्हाध्यक्ष अजय सरवदे
बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यामध्ये रस्त्याचे कामे चालू आहेत यासाठी मुरूम अत्यावश्यक आहे करिता गौण खनिजांचे उत्खनन व वाहतुकीसाठी परवाना देण्याचे अधिकार तहसीलदार यांना 500 ब्रासपर्यंत, उपविभागीय अधिकारी यांना 501 ते 2012 ब्रासपर्यंत व जिल्हाधिकारी यांना 2001 ते 25000 पर्यंत प्रदान करण्यात आले आहे.
डीसीए इन्फ्रा चकलांबा श्री.अजमेरा यांना मौजे आडपिंपरी येथील ग.नं.व44 मधून रस्त्याच्या कामासाठी मुरूम उत्खननासाठी रॉयल्टी भरणा करून मुरूम उत्खननासाठी परवानगी देण्यात आली होती. 
गेवराई तहसीलदार खोमणे, मंडळ अधिकारी चकलांबा व तलाठी आडपिंपरी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत शासन नियमावलीचे उल्लंघन करत आडपिंपरी येथील गट नंबर 44 या एकाच ठिकाणाहून 500 ब्रासच्या 25 वेळेस 12500 ब्रास मुरूम उत्खननाची नियमबाह्य परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी बीड यांचेकडून एकत्रित 12500 ब्रासची मुरूम उत्खनन परवानगी घेणे अपेक्षित होते सदर प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, बीड यांचे दुर्लक्षामुळे गेवराई तालुक्यातील अधिकारी-कर्मचारी भयमुक्त
चौकट :- तहसीलदार गेवराई, मंडळ अधिकारी चकलंबा, तलाठी आडपिंपरी यांच्या संगनमताने डीसीए इन्फ्रा चकलांबा श्री.अजमेरा हे अवैध मुरूम उत्खनन करत असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकरणी मुरूम उपसा थांबवत गेवराई तहसील कार्यक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी यांच्यावर विश्वास नसल्याने बीड तालुक्यातील मंडळ अधिकारी यांच्याकडून सदर ठिकाणाचा पंचनामा करत ईटीएस मोजणी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड, जिल्हा खनीकर्म अधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी बीड यांचेकडे केली आहे. गेवराई तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी सदर प्रकरणाची माहिती दिल्याने ह घोटाळा बाहेर निघत आहे.
अजय सरवदे
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी बीड

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी