चौसाळा येथे मराठा आरक्षण व संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पांठीबा म्हणुन राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन-सतिष(भाऊ) जोगदंड
(चौसाळा प्रतिनिधी) महाराष्ट्रातील मराठयांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे व ईतर मागण्यासाठी संघर्षयोध्दा सरसेनापती मनोज दादा जरांगे पाटील हे अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे दि.२५/०१/२०२५ पासून अमरण उपोषणाला बसले आहेत .त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये चिंता पसरली असुन महाराष्ट्र सरकारने त्यांच्या खालवलेल्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्या या साठी बीड तालुक्यातील बालाघाटावरील चौसाळा येथे दि.२९/०१/२०२५ वार बुधवार रोजी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहीती चौसाळा येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा सेवक सतिष (भाऊ)जोगदंड यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment