शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूकीतील आरोपी यांना जामीन देण्यास मा. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला नकार ११ फेब्रुवारी पर्यंत यावे लागणार पोलीसांना शरण
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यात कोट्यवधींची झालेली फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरात गाजत असलेले शेअर मार्केट मार्फत गुंतवणूक फसवणूकीतील फरार आरोपी ज्ञानेश्वर कवडे याला मा. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यामुळे येत्या ११ फेब्रुवारी २०२५ पयॅत आरोपी ला शेवगांव पोलिसांसमोर यावे लागणार शरण.
शेवगाव तालुक्यातील राक्षी या गावातील असलेले फिर्यादी राजू दोरखे यांनी भाऊसाहेब कवडे, ज्ञानेश्वर कवडे व इतरांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे त्यांची व इतर गुंतवणूकदार यांची रक्कम रुपये 63 लाख 70 हजार ऐवढे रकमेची आथिर्क फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दाखल केली होती, सदरील फिर्यादीमध्ये फिर्यादी यांनी ज्ञानेश्वर कवडे यांच्यावर आरोप करताना असे सांगितले की ज्ञानेश्वर कवडे यांचे "शिवटेक सोलुश्यन" ही शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी त्यांना त्यांच्या आथिर्क गुंतवणूकीवर जास्तीच 12 टक्के परतावा व्याज देऊ म्हणून फिर्यादी व इतरांकडून रक्कम घेतली, तसा विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादी व इतर गुंतवणूक दार यांनी आरोपीकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली परंतु ज्ञानेश्वर कवडे, भाऊसाहेब कवडे यांनी परतावा दिला नाही तसेच त्यांची मुद्दल रक्कम ही त्यांना परत न दिल्यामुळे व त्यांची फसवणूक झाल्यामुळे फिर्यादी यांनी शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सदरील आरोपीवर भारतीय दंड अधिनियमा बरोबरच, गुंतवणूकदार यांची फसवणूक केल्यामुळे एम. पी. आय. डी. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला.
सदरील फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर कवडे यांनी मा. सत्र न्यायालय अहमदनगर येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सदरील अर्ज फेटाळल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर कवडे यांनी सन्माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अटकपूर्वक जामीन मिळण्यासाठी अपील दाखल केले होते, सदर अपिलामध्ये फिर्यादी राजू दोरखे यांनी ॲड. संदीप आंधळे यांच्यामार्फत त्यांचा जामीन न होण्यासाठी त्यांचे म्हणणे मांडले,
सदरचे अपीलाची सुनावणी मा. न्यायमूर्ती वाय. जी. खोब्रागडे साहेब यांच्या समोर झाली सदरची सुनावणी व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता माननीय उच्च न्यायालयाने सदरील आरोपी जामीन देण्यात नकार दिला तसेच सदर आरोपीने 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत शेवगाव पोलीस स्टेशन येण्यासंदर्भात आदेश दिले.सदरच्या अपिलामध्ये मुळ फिर्यादी यांच्या तर्फे ॲड. संदिप आंधळे व ॲड. सागर मडके ॲड सचिन आघाव यांनी काम पाहिले. सरकारच्या वतीने एस. एम. गणाचारी यांनी काम पाहिले.
या घोटाळ्यातील अनेक मोठे शार्क मासे पोलिसांना गुंगारा घेण्यात यशश्वी झाले आहेत पण "बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी" आका आणि आकाचा आका पण पोलिसांच्या रडारवर आहे लवकरच ते अलगद पोलिसांच्या तावडीत सापडतील अशी आशा फसवणुक झालेल्या गुंतवणूक दारांना आहे
क्रमशः}
Comments
Post a Comment