विश्वाच्या शांतीसाठी बुद्धांचे विचार प्रेरणादायी आहेत डॉ.ली ची रान



 बीड प्रतिनिधी - अल्पकाळातच ऐतिहासिक धम्मभूमी शिवणी येथे प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो पूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली भंते धमशील थेरो यांनी प्रियदर्शी संस्थेच्या सर्व सभासद व बीड परिसरातील दानसुरू उपासक उपासिकांच्या अनमोल दानातून धम्मकार्यास अनेक उपक्रमाद्वारे गती दिली. संपूर्ण जिल्ह्यात धम्माचे प्रसार व प्रचार करण्याचे कार्य करीत आहेत. अशा धम्मभूमीला दक्षिण कोरिया धम्म गुरुचे एक शिस्ट मंडळ ज्यामध्ये कोरियन बौद्ध विद्यापीठाचे माजी कुलगुरू धम्मगुरु डॉ. ली ची रान आणि बुल्गावांग जीओल बौद्ध मंदिर सिवोल येथील मुख्य मठाधिपती भिक्खू थेर यिम चांग वू यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान भिक्खूगणांनी भेट देऊन. सर्वप्रथम भदंत आनंद कौशल्ययान यांनी वृक्षारोपण केलेल्या बोधिवृक्षाचे कोरियन पद्धतीने विधिवत पूजन केले. धम्महॉल शिवणी येथे धम्मगुरूंचा संस्थेतर्फे भव्य असा सत्कार करण्यात आला. भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या इंग्रजी ग्रंथातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, प्रज्ञा, शिल, करुणा या तथागताच्या महान शिकवणीचा इंग्रजी ग्रंथाचा कोरियन भाषेत भाषांतर करण्याचा मनोदय डॉ.ली ची रान यांनी व्यक्त केला. या महान कार्यासाठी " लक्ष्मण दादा रोडे प्रतिष्ठानचे" प्रा. प्रदीप रोडे यांनी डॉ. रान यांना 1 लाखाचा धनादेश मदत म्हणून नम्रपणे धम्माच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जागतिक दर्जाच्या उच्च विचाराचा व शिकवणीचा प्रसार व प्रचार करता दिला.

 कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी तर भिक्कूगणांचा परिचय व त्यांच्या उपदेशाचा, उच्चशिक्षित नितीन साळवे पुणे यांनी ओघवत्या मराठी भाषेत अनुवाद केला. आपल्या धम्मदेशनेत डॉ. रान म्हणाले की जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या काठावर उभे आहे. अणुअस्त्रामुळे जग कधीही नष्ट होईल ते सांगता येत नाही. त्याकरिता तथागत गौतम बुद्धांची करुणा व मैत्री हे अनमोल विचार जगाला तारू शकतात असे अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले.
शिवनी येथील धम्मभूमीचे नैसर्गिक वातावरण बघून पूज्य भिक्खु प्रभावित झाले व या भूमीतील मानवाच्या कल्याणाचे तरंग पुढील बांधवाला दुःख मुक्तीकडे नेतील. हीच ऊर्जा घेऊन येथे भावलेला मंगल भाव घेऊन आम्ही कोरियाला जाऊ. तेथील धम्म बांधवांना तथागतांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमितील आलेले अनुभव कथन करू असे भावपूर्ण उद्गार काढले.
 कार्यक्रमास बीड परिसरातील उपासक उपासिकांची बालकांची व संस्थेच्या बहुसंख्य सदस्यची उपस्थिती होती. सरनातयणे कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी