सौ.शितल जाधव यांच्या समर्थ लेडीज गारमेंट वतीने संक्रांती निमित्त पाटोद्यात हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील महिला युवा उद्योजिका सौ.शितल संदीप जाधव यांचे सुप्रसिद्ध समर्थ लेडीज गारमेंट यांच्या वतीने सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी संक्रातीचे निमित्त साधून हळदी- कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. हळदी-कुंकवाचा सन्मान देत सर्व महिलांना समर्थ लेडीज गारमेंट यांच्या वतीने वान देण्यात आले हळदी-कुंकू कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या सर्व महिलांचे आभार समर्थ लेडीज गारमेंटच्या मालकीन महिला युवा उद्योजिका सौ.शितल संदीप जाधव यांनी मानले
Comments
Post a Comment