पाटोद्यात भरदिवसा घरफोडी या घटनेनंतर शहरातील नागरिक भयभीत



 शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी माजी नगरसेवक रामदास गिते यांनी केली आहे

पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा शहरातील शिक्षक कॉलनीतील निवृत्त शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी मंगळवारी भर दिवसा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. घराला लावलेले कुलूप कोंड्यासह तोडून चोरांनी घरात प्रवेश केला.याच वेळेला अंत्यविधीसाठी गेलेल्या शिक्षिका घरी परतल्या. त्यांनी एक चोरटा पकडला, मात्र दुसऱ्या चोरट्याने कोयत्याचा धाक दाखवल्याने चोरटा सुटला आणि तिन्ही चोर पसार झाले या घटनेनंतर पाटोदा शहरात भितीचे वातावरण झाले असुन पाटोदा शहरातील प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी माजी नगरसेवक रामदास गिते यांनी केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी