लिंबागणेश बसस्थानकावरील साधना मेडिकल चोरट्यांनी फोडले ; चोरटे सीसीटीव्हीत कैद



लिंबागणेश:-( दि.०१ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानकस्थित एकनाथ तागड यांच्या मालकीचे साधना मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आज दि.०१ शनिवार रोजी पहाटे ४ वाजता चोरट्यांनी फोडल्याचे आढळून आले. दुकानात असलेल्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असुन मेडिकल स्टोअर्स वरील मराठवाडा अर्बन को.आप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँक बीड शाखा लिंबागणेश येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणी नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि चंद्रकांत गोसावी यांना फोनवरून कल्पना दिली आहे.
साधना मेडिकल स्टोअर्सचे मालक एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार ते रात्री २ वाजता ज्वारी ,गहु भिजण्यासाठी रानात गेले होते. सकाळी ६ वाजता त्यांना त्यांचे दुकान फोडले असल्याचा फोन आला. दुकानात येऊन सीसीटीव्हीत पाहिले असता पहाटे ४ वाजता ३ जण तोंडावर रूमाल बांधुन कटर,टांबी ईतर साहित्याच्या सहाय्याने शटरचे दोन्ही कुलुप तोडून आत शिरून गल्ल्यातील पैसे काढून घेत असल्याचे दिसत आहे. एकनाथ तागड यांच्या म्हणण्यानुसार गल्ल्यातील ५००० रूपये चोरट्यांनी लंपास केले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी