आमदार सुरेश आण्णा धस यांच्या वाढदिवसा निमित्त नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव यांचा स्तुत्य उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपाचे आयोजन
पाटोदा (गणेश शेवाळे)बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निघृण हत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. केवळ येणाऱ्या प्रत्येकाशी ते भेटणार असून कुठल्याही प्रकारचे हार -तुरे,शाल, फेटे न स्वीकारता हा वाढदिवस अंत्यंत साध्या पद्धतीने तसेच शैक्षणिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यासह वाचनालय,यांना उपयुक्त अशी पुस्तके भेट म्हणून ते स्वीकारणार असल्याने आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसा निमित्त पाटोदा नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव यांनी पाटोदा शहरातील सर्व शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव पुढे बोलताना म्हणाले की, आष्टी मतदार संघाचे भाग्यविधाते दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्त्व, गोरगरीब, दीन दुबळ्यांचे कैवारी आमदार सुरेश धस यांचा २ फेब्रुवारी वाढदिवस असतो त्या वाढदिवसा निमित्त यंदा पाटोदा शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप,गो शाळेला पत्रे व चारा वाटप, तसेच बारगजे सर यांच्या ईन्फंट इंडिया,पाली शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान तसेच पाटोदा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून पंतप्रधान घरकुल आवास योजना शुभारंभ आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवसा निमित्त नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांनी सामाजिक सलोखा वाढेल अशा साध्या पद्धतीने आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भाग्यविधाता आमदार सुरेश आण्णा धस यांचा वाढदिवस पाटोद्यात साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमास नगर उपाध्यक्ष, गटनेते,सभापती सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी,गट प्रमुख,गण प्रमुख,कार्यकर्ते व सर्व सामान्य आण्णावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आशे नम्र पणे आवाहन नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment