एकल महिला संघटना च्या वतीने तिळगुळ कार्यक्रम संपन्न



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य कृतीत उतरून महिलांच्या सोबत एकल महिला संघटना करत आहे. एकल महिला संघटना ही मागील 10 वर्षांपासून महिलांच्या सामाजिक जाचक परंपरा, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय बदलासाठी कार्य करत आहे.
समाजात एकल महिलांना विविध प्रकारच्या समस्या सामोरे जावे लागत आहे आपण कितीही शिक्षण घेतले तरी विचारांची समज अजूनही तेवढी वाढली नसून अजूनही महिलांना दुय्यम स्थान आहे.
याच विचारातून एकल महिला संघटना ही आज महिलांना समान हक्क मिळावा व सर्व प्रकारे स्वतंत्र जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करत आहे आज एकल महिला शिक्षण, आरोग्य, रोजगार, आर्थिक सक्षम होत आहेत 
परंतु संविधानिक मूल्य महिलांना कळतील त्यावेळी तिला समज वाढेल तेव्हा ती पेटून। उठेल, हक्क व अधिकार मिळवू शकते
तिला पण इतर महिला सारखे जीवन जगावे वाटते ती पण एक माणूस आहे 
समाजात ज्या गोष्टी महिलांना नाकारल्या जातात तिथे संघटना ने छेद दिला आहे मग फक्त चूल व मूल मर्यादित न ठेवता आमच्या महिला सर्व स्तरावर समान वागणूक मिळावी व महामानवांचे अधुरे कार्य विचार महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समान विचार, समानतेचा रथ पुढे घेऊन जाण्याचे काम ही संघटना सतत करत आहे 
यावेळी कार्यक्रमात एकल महिला संघटना सुरुवातिपासून च्या अर्चना ताई नागरगोजे, कुशावरता ताई घोलप यांनी संघटना सुरुवातीचा सर्व प्रवास कार्याची माहिती व उद्देश सांगितला सहभागी सर्व मराठवाड्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर यासाठी वाण म्हणून संविधान उद्देशिका देण्यात आल्या तर एकल व इतर सर्व महिला सहभागी झाल्या होत्या सर्व महिलांनी एकमेकांना गजरे लावून आम्ही सर्व एक माणूस आहोत व आम्ही एक आहोत हे संदेश दिला यावेळी कांता शिंदे, जमीला तांबोळी, सुवरणा ननवरे, नौशाद शेख, अनुराधा आंबूरे, सुरेखा भोसले, सुमित्रा आलूरे, महानंदा चव्हाण, मंगल कानडे, कौशल्या कळसुले, प्रजावती जोगदंड, लता सावंत, भाग्यश्री रणदिवे, आम्रपाली तिगोटे, हजरत शेख, द्रौपदी गवळे, विद्या डोरणाळी अर्चना पवार, तारा घोडके, उर्मिला गालफडे, मस्केताई, आदी महिला खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी