गेवराई शहरात संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन
भजन, भारुड, कीर्तन, शिवमहापुराण कथा, मातृपूजन या सह विविध भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल
गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 8888435869
संस्कृती प्रतिष्ठान च्या वतिने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सोमवार दि.३ फेब्रुवारी पासुन भव्य सत्संग किर्तन सोहळा महोत्सवास प्रारंभ होत असुन या सोहळ्यात महाराष्ट्रातील दिगज किर्तनकारांची किर्तन सेवेसाठी उपस्थिती लाभणार आहे. या किर्तन महोत्सवाचे हे १८ वे वर्ष आहे. सध्या या सत्संग किर्तन सोहळ्याची जोरदार तयारी चालु असुन प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पदाधिकारी आपले मोलाचे योगदान देत आहेत. तरी गेवराईकरांनी या सत्संग किर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आले आहे.
गेवराई येथे संस्कृती प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या १७ वर्षापासून भव्य दिव्य अश्या सत्संग किर्तन सोहळ्याचे दरवर्षी नियोजनबध्द अयोजन केले जात आहे. यामध्ये शहरातील तसेच तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. तर या वर्षीच्या सत्संग किर्तन सोहळ्यास दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. प्रतिमापूजन रामेश्वर महाराज राऊत, मनोहरभाऊ पिसाळ, शिवनाथ मस्के यांच्या हस्ते व कलश पुजन प्रभाकर पराड, संजय भालशंकर, चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते होऊन सप्ताहाची सुरुवात होणार आहे. सत्संग कीर्तन सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. पूर्ण सप्ताह रोज दुपारी ०१ ते ०४ सुप्रसिद्ध कथाकार ह.भ.प.प्रकाश महाराज साठे यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा असणारा असून, सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजी सायं ०६ वा. प्रसिद्ध शहनाईवादक पं. कल्याणजी अपार (पुणे) यांचे शहनाई गुंजन कार्यक्रम. सायं. ८ वाजता. ह.भ.प. विलास महाराज गेजगे (बोथीकर, गंगाखेड) यांचे सुश्राव्य किर्तन. तर मंगळवार दि.४ फेब्रुवारी रोजी सायं ०६ वा. इंद्रजित आण्णा येवले यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. नारायण महाराज पालमकर (बाळकृष्ण महाराज संस्थान, गुरुपीठ) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन तर बुधवार दि.५ फेब्रुवारी सायं ०६ वा. प्रसिद्ध भारुड सम्राट प्रभाकर महाराज कुटे यांचा भारुडाचा प्रबोधनपर कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. कीर्तनरत्न प्रमोद महाराज जगताप (पुणे) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन, गुरूवार दि.६ फेब्रुवारी रोजी सायं ०६ वा. संगित अलंकार सुरंजन जायभाये व कु. भक्ती जायभाये यांचा अभंगवाणी कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. कीर्तनरत्न प्रशांत महाराज ताकोते (अकोला जि. बुलढाणा) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन तर शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी सायं ०६ वा. संगित अलंकार डॉ. तुळशीरामजी आतकरे गुरुजी यांचा अभंगनाद कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. श्रीगुरू पुंडलिक महाराज देहुकर ( संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ) यांचे सुश्राव्य हरीकिर्तन, शनिवार दि.८ फेब्रुवारी सायं ५:३० ते ८:०० संत भगवानबाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्कार व तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या आईचा मानृपूजन सोहळा, सायं. ८ वाजता. ह.भ.प. कीर्तनरत्न संजय महाराज भोसले (वेळुकर,) सातारा यांचे सुश्राव्य हरीकीर्तन, रविवार दि.९ फेब्रुवारी सायं ०६ वा. संगीत अलंकार राधाकृष्णण गरड गुरूजी (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांचा भजनसंध्या कार्यक्रम सायं. ८ वाजता. ह.भ.प. कृष्णा महाराज शास्त्री (उत्तराधिकारी श्रीक्षेत्र भगवानगड) यांचे सुश्राव्य हरीकीर्तन, सोमवार दि. १० फेब्रुवारी सकाळी ११ ते ०१ ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर (श्री क्षेत्र माऊली महाराज संस्थान चाकरवाडी) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताहाचे अध्यक्ष संतोष भोसले, स्वागत अध्यक्ष परमेश्वर महाराज वाघमोडे, सचिन ढाकणे, प्रमुख मार्गदर्शक अक्रूर महाराज साखरे, उत्तम नाना मोटे, मधुकर तौर, समन्वयक माधव चाटे यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment