प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ हटवा आष्टी मतदार संघ खड्ड्यात जाण्यापासून वाचवा-मनसेचे कैलास दरेकर यांची मागणी


आष्टी (प्रतिनिधी-गोरख मोरे ) :    
          सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन बीड येथील प्रभारी कार्यकारी अभियंता श्रीकृष्ण लिंबाजी पान संबळ हे सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्त झाल्यापासून सातत्याने बीड विभागातच कार्यरत आहेत . त्यांचे अनेक स्थानिक पुढाऱ्यांची लागेबांधे असल्याने त्यांच्या काळात अनेक बोगस कामे झाली असून अनेक निकृष्टपणे कामे करण्यात आली असून , अनेक कामांमध्ये अनियमित्ता करण्यात आलेले आहे . सध्या ही याच पद्धतीने कामे सुरू असून , शाखा अभियंता पदावर कार्यरत असताना संबंधित श्रीपाद संबळ यांच्याकडे काही काळ बीड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चा उपकार्यकारी अभियंता म्हणून पदभार होता तसेच या काळात शिरूर / पाटोदा या दोन्ही उपविभागात शाखा अभियंता व शिरूर कासार चे उपअभियंता म्हणून त्यांच्याकडे परिवार होता . एक शाखा अभियान त्याला चार--चार पदभार कसे देण्यात आले ? तसेच सध्याही त्यांच्याकडे प्रभारी कार्यकारी अभियंता यांचा पदभार व आष्टी उपविभागाच्या उपाभियंता तसेच शिरूर उपविभागाचे उपअभियंता आहेत . अनेक पदावर असणारे पाणसंबळ हे दिव्यांग असल्याचा समजते . ते दिव्यांगाच्या नेमके कोणत्या वर्गवारीत मोडतात ? व त्यांची दिवंगत्वाची टक्केवारी किती ? याची विभागाबाहेरील जिल्हा शल्यचिकित्सका मार्फत तपासणी करण्यात यावी . गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या कार्यकाळातील एफ डी आर , डोंगर किनी, पिंपळवंडी , अमळनेर रस्ता काम, कुसळम , वांजरा फाटा, पशुवैद्यकीय दवाखाना आष्टी तसेच पैठण रस्त्यावरील पूल या कामात मोठ्या प्रमाणात अनियमित्ता करण्यात आलेली असून , हे सर्व कामे जवळपास 23 कोटीचे आहेत . या सर्व कामांची तक्रार यापूर्वी सर्व विभागाकडे केल्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठामध्ये याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आलेले आहे . तसेच लोक आयुक्तांकडेही यांनी निकृष्ट कामाच्या व अनियमिततेच्या कामांची तक्रार करण्यात आलेली आहे . तरी वरील सर्व निकृष्ट कामे हे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याने करण्यात आलेली आहे . व तसेच स्थानिक पुढाऱ्याच्या वरद हस्ताने गेल्या अनेक वर्षापासून संबंधित अधिकारी याच ठिकाणी कार्यरत असल्या मुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी मुख्य अभियंता यांच्याकडे संबंधित प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ यांची विभागाबाहेर बदली करून सदरील त्यांच्या काळातील सर्व कामातील अनियमिततेची व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे कैलास दरेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी