सामाजिक युवा कार्यकर्त्या सपनाताई माळी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
पाटोदा (गणेश शेवाळे) दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचे अवचित साधून उम्मत सामाजिक विकास संस्था यांच्यावतीने स्वारगेट,पुणे येथील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह,सारसबाग येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी उम्मत सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्माननीय पुरस्कार 2025 देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उम्मत सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज बागवान, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक व राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रकाश पवार सर,महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे चे विश्वस्त सचिव अनवर राजन सर, महेंद्र माणिकचंद सुंदेचा(मुथ्था), पुणे कॉंग्रेसचे आमदार मोहनददा जोशी, आरपीआयचे बाबुराव घाडगे,उद्योजक मानसिंगराव पाटील, निताताई होले या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सपनाताई माळी शिवणकर यांना समाजरत्न पुरस्कार 2025 सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले सपनाताई माळी या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्या यंग पृथ्वी फाउंडेशनच्या संस्थापिका, तसेच मा.आ.श्री छगनरावजी भुजबळ युवा प्रतिष्ठानच्या संस्थापिका व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सोशल मीडिया प्रभारी महाराष्ट्र राज्य म्हणून काम पाहतात.तसेच ते उत्कृष्ट व्याख्याते कवी व लेखक आहेत.राजकीय व सामाजिक चालू घडामोडींवर रोखठोक लिखाण हे त्यांचे छंद. आतापर्यंत त्यांनी सामाजिक कार्य करत असताना अन्याय - अत्याचार यांच्या विरोधात आंदोलने, मोर्चे, उपोषणे करून संबंधित विभागात पत्रव्यवहार निवेदने देऊन तसेच शेवटपर्यंत पाठपुरावा करून त्या विषयाला न्याय देण्याचे काम त्यांनी केलेले आहेत. याच कामाची दखल घेऊन उम्मत सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने सामाजिक युवा कार्यकर्त्या सपनाताई माळी शिवणकर यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. सपनाताई यांना यापुर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत यामुळे सपनाताईंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment