माजी पालकमंत्री धनंजय मुंडेनीं मागासवर्गीयांच वाटोळं केलं-ॲड.विकास जोगदंड


बीड (प्रतिनिधी) 29 जानेवारी 
लोकप्रितनिधी हे सर्वसामान्यांचे अडीअडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यांनी निवडून दिलेले असतात त्यांनी सेवेकरी म्हणून जनसामान्यांची सेवाच केली पाहिजे मालक होऊन आपले बस्थान बसविणाऱ्यांना योग्य वेळी मायबाप जनता जनार्दन जागा दाखवते सत्ता आणि सत्तेतून भ्रष्ट मार्गाने अमाप पैसा आणि संपतीचा संचय करत 
सत्तेचा दुरुपयोग कसा करावा याचे प्रमाण अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले असून 
बीड जिल्हा विकासापासून लाखो मैल दूर नेला आहे 
जिल्हा वार्षिक योजनेतील प्रत्येक योजनेखाली येणाऱ्या निधीती स्वतः ची मक्तेदारी असल्यागत स्वहित करण्यातच मुंडे यांनी धन्यता मानली आहे 
महाराष्ट्र राज्यातील नागरी क्षेत्रातील विशेष घटक लोकसंख्येच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या नागरी वस्ती सुधार योजनेच्या अंमलबजावणी करिता अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा जसे की पाणी, मलनिसारण,जोड रस्ते, अंतर्गत रस्ते,समाज मंदिर,वाचनालय, व्यायाम शाळा,उद्यान सह आदी विकास कामे 
अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे 
साठी कोट्यावधी रु निधी शासनाकडून येतो 
परंतु निधी खर्च करण्याचे सर्वस्व अधिकार पालकमंत्री महोदयानां असल्याने माजी पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी 
राखीव प्रभागाच्या वाट्यास त्यांचे कार्यकाळात कायम उपेक्षा आणली असून राखीव प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदस्यांना निधी साठी मोठा संघर्ष करावा लागला आहे याचे उदाहरण द्यायचे झाले तर 
2024-25 या वर्षी चे देता येईल 
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा निधी प्राप्त होऊन 
देखील जाणीवपूर्वक अनुसूचित जातींच्या वस्त्यांचे अहित करून व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेत एकूण राखीव 6 प्रभागा पैकी केवळ प्रभाग क्र 2 या एकाच प्रभागा मधील 
  कामे ही अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांना सामूहिक लाभ होईल अशी सार्वजनिक हिताची व आवश्यक नसतांना देखील 
 4 कोटी 20 लाख रुपये इतका निधी नियम बाह्ययपणे दिला आहे हा एकप्रकारे राखीव प्रभागवर माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अन्याय केला असून राखीव प्रभागाच्या विकासाला अडथळा आणत धनंजय मुंडे यांनी मागासवर्गीयांचे वाटोळे केले असल्याचा आरोप भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक /अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे यावर्षीच्या निधीतून 1 रु निधी देखील राखीव प्रभाग वगळता इतरत्र खर्च करू देणार नाही या साठी लोकशाही मार्गाने आपण लढत राहणार असल्याचे ही ॲड विकास जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी