रा.प.कामगारांना शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे पगारवाढीच्या मागणीसाठी बीड विभागीय कार्यालयावर निदर्शने - ससाणे सुरेश
बीड प्रतिनिधी - विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि ४ सप्टेंबर २०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एस टी कामगारांच्या संघटना प्रतिनिधी बरोबर झालेल्या बैठकीत रा प कामगारांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला होता मात्र तरीही रा प कामगारांना शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे पगारवाढ मिळाली नाही नुकताच केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शासकीय कर्मचारी आणि रा प कर्मचारी यांच्या पगारात प्रचंड तफावत निर्माण होणार आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी यांच्या पगाराच्या तुलनेत रा प कामगारांना कमी पगारात काम करावे लागणार आहे म्हणून भविष्यात निर्माण होणारी तफावत दूर करण्यासाठी रा.प.कामगारांना शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणे पगारवाढ मिळावी यासाठी २०२४-२०२८ चा पगारवाढीचा कामगार करार करण्यात यावा किंवा रा प कामगारांना वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर तसेच मध्यवर्ती कार्यालय, कार्यशाळेसमोर मंगळवार दि २८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १-०० ते २-०० वा च्या दरम्यान निदर्शने करण्यात येणार आहेत अशी माहिती कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष ससाणे सुरेश यांनी दिली आहे.
बीड विभागीय कार्यालयासमोर विभागाच्या वतीने संघटनेचे विभागीय अध्यक्ष ससाणे सुरेश , विभागीय सचिव रियाज महंमद, विभागीय सह सचिव राजेश मस्के यांच्या उपस्थितीत ही निदर्शने करण्यात येणार आहेत. कामगारांच्या पगारवाढीच्या मागणी सोबतच, एप्रिल २०१६ पासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा फरक देण्यात यावा, घरभाडे भत्ता वाढीचा फरक देण्यात यावा,२०१८ पासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता वाढीचा फरक देण्यात यावा,दि ४ सप्टेंबर रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या एप्रिल २०२० पासूनच्या पगारवाढीचा फरक तात्काळ देण्यात यावा,पी एफ चे कपात करण्यात आलेल्या वर्गणीची रक्कम खात्यामध्ये जमा करावी (भविष्य निर्वाह निधी),एस टी को औप बैंकेची वसूल करण्यात आलेली रक्कम जमा करावी,(त्यामुळे पी एफ व एस टी को औप बैंकेची कर्ज कामगारांना मिळण्याचा अडथळा दूर होईल),खाजगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात आल्याने रा.प.कामगारांना (चालकांना) कामगिरी मिळत नाही त्यामुळे खाजगी बसेस कंत्राटी पद्धतीने घेण्यात येऊ नये, मध्यवर्ती कार्यशाळेतील कामे बाह्य संस्थेकडून करून न घेता रा.प.कामगारांकडून करून घेण्यात यावी,रा प कामगारांना तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा मोफत प्रवास पास वर्षभरासाठी देण्यात यावा व सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, शिस्त व आवेदन कार्यपद्धतीतील जाचक बाबींचा पुनर्विचार करून त्यात सुधारणा करावी,रा. प.कामगारांना कैशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, मागासवर्गीयांचा भरती, बढतीतील अनुशेष भरून काढण्यात यावा, मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी ह्या मागण्या सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या ह्या आंदोलनात संघटनेचे सह सचिव तथा विभागीय अध्यक्ष ससाणे सुरेश, सचिव रियाज महंमद बीड विभागीय कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, किशोर कुमार वाघमारे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य, प्रादेशिक कोषाध्यक्ष सुभाष कोकाटे, प्रादेशिक कार्याध्यक्ष मैनुद्दीन , ज्येष्ठ नेते अनिल बनसोडे, ज्येष्ठ नेते मामा गायकवाड यांच्यासह बीड विभागातील आगारातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी सह सचिव राजेश मस्के यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment