*समाजाला संत गाडगेबाबा यांच्या विचारांची गरज-डॉ कैलास वायभासे
आष्टी ( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या पाठीमागे न लागता अभ्यास करावा. मोबाईल हे जेवढे फायद्याचे आहेत तेवढे त्याच्यापासून तोटे ही असल्या मुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर योग्य करावा . विद्यार्थी हा देशाचा भावी आधारस्तंभ असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आज नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उच्च अधिकारी बनऊन आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे .
आजच्या समाजाला समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कैलास वायभासे यांनी व्यक्त केले .
ते डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचोली (ता आष्टी) येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते .
या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भास्कर धलावडे, बबन दहातोंडे, किशोर अंधारे, शरद जाधव, शेख मुनीर फौजी, सुधीर ठाणगे, दिनेश जाधव, श्रीमती थोरवे, हौसराव भालेराव, हरिश्चंद्र गाडे, माजी सरपंच महादेव इथापे आदी उपस्थित होते . या वेळी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली असून , कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ उस्मान खान पठाण यांनी केले . या कार्यक्रमाला प्रा.निसार शेख, डॉ.रमेश खिळदकर, प्रा विवेक महाजन, प्रा आजिनाथ गिलचे, प्रा राजेंद्र मिसाळ, प्रा आतेश बनसोडे, प्रा ज्ञानेश्वर अम्रीत, प्रा डॉ बोराडे बाळू, प्रा राजू शेलार, प्रा शबाना शेख, प्रा रत्नमाला तरटे, प्रा सुभाष मोरे, प्रा ज्ञानदेव बोडखे, प्रा गोरक्षनाथ वाळके, प्रा सतीश तागड यांच्यासह विद्यार्थी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ संजय झांजे यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा गहिनीनाथ एकशिंगे यांनी मानले .
Comments
Post a Comment