छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल व छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण समस्यांच्या विळख्यात ; क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल व छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण समस्यांच्या विळख्यात ; क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन :- डॉ.गणेश ढवळे
बीड:- ( दि.२६) जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्याकडे असलेल्या खेळातील कौशल्याला पुढे संधी मिळावी आणि त्यामधून खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रिडा संकुलांची निर्मिती करण्यात आली.खेळाडुंसाठी उपयुक्त ठरणारे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण समस्यांच्या विळख्यात असुन संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष आणि नियमित देखभाल करण्याकडे दुर्लक्ष यामुळे
खेळाडुंना असुविधेचा सामना करावा लागत आहे. क्रिडा संकुलाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेला निधी प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यातील क्रिडांगणाची विकास कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे क्रिडा संकुलांची कामे रखडलेल्या अवस्थेत असुन आवश्यक निधी देण्यात यावा आणि कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन क्रिडा मंत्री महाराष्ट्र राज्य दत्तात्रय भरणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील मुद्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड, शेख मुबीन ,शिवशर्मा शेलार आदी सहभागी होते.
छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणाची दुरावस्था ; राजकीय सभांना निर्बंध घालावेत :- डॉ.गणेश ढवळे
---
छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणाची दुरावस्था झाली असुन नियमित स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात येत नसल्याने सकाळी आणि सायंकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. व्यायामासाठी बसविण्यात आलेले लोखंडी साहित्याची मोडतोड झाली असुन याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच या क्रिडांगणावर राजकीय सभा व इतर कार्यक्रमांमुळे क्रिडांगणाची दुरावस्था होत असुन या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात यावेत.हे क्रिडांगण खेळासाठी आरक्षित आहे. अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment