सार्वजनिक बांधकाम विभाग बीड 2 चे कनिष्ठ अभियंता सय्यद ए.जी. यांचा आज सेवापुर्ती गौरव समारंभ सोहळा


बीड प्रतिनिधी 
सार्वजनिक बांधकाम विभाग बीड क्र. 2. अंतर्गत सा. बां. उपविभाग शिरुर (का.) चे उपविभागाचे कनिष्ठ अभियंता ए.जी.सय्यद यांचा आज दि. 31.01.2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने शासकीय विश्रामगृह बीड येथे सायंकाळी 5 वा सेवापुर्ती गौरव समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सेवापूर्ती सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आर. पी. तोंडे सर कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग बीड तसेच के. एल. पानसंबळ सर कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग बीड क्र. 2, यासह एस.ए. मोमीन सर कार्यकारी अभियंता जि.प.बां. विभाग बीड, खादरी एम. ए.सर उपकार्यकारी अभियंता सा. बां. विभाग क्र. 2, उपविभागीय अभियंता सी.पी. बोराडे सर सा.बा. उपविभाग बीड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल. के. पानसंबंळ हे राहणार आहेत.
सत्कारमूर्ती कनिष्ठ अभियंता सय्यद ए. जी. हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व तांत्रिकदृष्ट्या सक्षम अभियंता असून त्यांच्या अंगी स्वयंशिस्त होती. त्यांची सेवा पाटोदा, वडवणी, शिरुर येथे यशस्वीरित्या पुर्ण झालेली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धडाडीने कामे केल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी आपल्या कार्यकाळात यशस्वीरित्या अनेक विकास कामे केली.त्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले.त्यामुळे आज होणाऱ्या सेवापुर्ती सोहळ्यास सर्व हितचिंतक व सहकारी मित्र आणि अभियंत्यानी उपस्थित राहुन सेवापुर्ती गौरव सोहळवाची शोभा वाढवावी असे आवाहन सा. बा. उपविभाग शिरुर कासार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी