आनंद बुद्ध विहारात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



बीड प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चक्रधर नगर येथील आनंद बुद्ध विहारत प्रमुख व्याख्याते प्रा. वसंतराव ओगले, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुग्रीव धन्वे व उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत सायंकाळी ०६ वाजता अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक छायाताई साळवे यांनी केले तर प्रा.डॉ.धम्मपाल घुमरे यांच्या नंतर व्याख्याते प्रा.वसंतराव ओगले यांनी डॉ.बाबासाहेबांच्या महानतेच्या पैलूवर प्रकाश टाकलात त्यांच्यातील विद्वत्ता, समर्पण,व संघर्ष या बाबी स्पष्ट केल्या व पुढील पिढीने या बाबींचे अनुसरण करावे असे सांगितले. सुग्रीव धन्वे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एम.भोले यांनी केले तर आभार वैशाली शिंदे/उजगरे यांनी मानले. कार्यक्रमास एड. एस.एम.साळवे, बळीराम दळवी, घोडेराव सुभाष टाकणकार, प्रवीण टाकणकार, सिद्धार्थ ससाने, रघुनाथ शेवाळे,एड. रोहन साळवे, इंजि.प्रफुल्ल धन्वे, प्रा.जावळे, पटेकर ताई, घोडेराव ताई, शेवाळे ताई बहुसंख्य उपासक उपासिका व बालक बालकांची उपस्थिती होती शरणातयेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी