कृती गौरव पुरस्कार सोहळ्यातील इच्छुक लोकांना चित्रपट आणि गाण्यांमध्ये काम करण्याची संधी देणार :दिग्दर्शक भूषण सरदार
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई (प्रतिनिधी ) बीएसएफ बहुउद्देशीय संस्था उपेक्षित नायक न्यूज संत कबीर बहुउद्देशीय संस्था व संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज यांचे प्रसिद्ध तीर्थस्थळ शेगाव येथे कृती गौरव राजश्री पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 21 डिसेंबर रोजी करण्यात आलेले आहे सामाजिक कला पत्रकारिता शैक्षणिक क्षेत्रातील प्रशासकीय आरोग्य व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार सोहळा भव्य दिव्य होणारा असून कलाक्षेत्रातील दिग्गज लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून हा सोहळा उत्कृष्टपणे पार पाडावा यासाठी अहोरात्र मेहनत पत्रकार रामभाऊ आवारे पत्रकार श्याम जाधव वैशाली सोनवणे पत्रकार मुकुंद आव्हाड राजनंदिनी अहिरे व सर्व आयोजक समिती या कार्यक्रमासाठी नवरात्र मेहनत घेत आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार असून संत कबीर बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष राजेंद्र हेलोडे सह आयोजक आहेत जे इच्छुक लोक आहेत ज्यांना अभिनय जमतो त्यांना येणाऱ्या शॉर्ट फिल्म गाण्यांमध्ये संधी देण्यात येईल असे आयोजक भूषण सरदार यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले तेव्हा अधिक माहितीसाठी पुरस्कार सोहळा मुख्य आयोजक भूषण सरदार यांच्याशी संपर्क साधावा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 94 20 62 19 94 या नंबर वर संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे
Comments
Post a Comment