चौसाळा - देवीबाभुळगाव रस्त्यावरील साईड पंख्यावर रोवले विजेचे खांब

चौसाळा - देवीबाभुळगाव रस्त्यावरील साईड पंख्यावर रोवले विजेचे खांब

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार - विवेक कुचेकर 
(चौसाळा प्रतिनिधी) : महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकरवाडी या देवस्थानकडे चौसाळा - देवीबाभुळगाव - सात्रा - पोत्रा - आंबील वडगाव मार्गे चाकरवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर चौसाळा ते देबीबाभुळगाव च्या दरम्यान महावितरण विभागा मार्फत वीज वाहिनीचे खांब (पोल) उभारण्याचे काम सुरू आहे. सदरील कामामध्ये अनेक ठिकाणी वीज पोल रस्त्याच्या कडेला साईड पंख्यावर अवघ्या ४ ते ५ तर कुठे ५ ते ६ फुट अंतरावर उभे केले गेले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे.

सदरील रस्ता हा चाकरवाडी या देवस्थानकडे जात असल्याने हा दैनंदिन मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा रस्ता असून वाहतुकीची वर्दळही कायम मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रस्त्याला लागूनच उभारलेले वीज पोल हे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण करणारे असून त्यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना पुढील परिणाम उद्भवू शकतात – वाहनांचे रस्त्यावरून सुटण्याची किंवा घसरून पोलला धडकण्याची शक्यता वाढते, दोन चाकी व चार चाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अपघाताचा धोका निर्माण होत आहे, रात्रीच्या वेळी दृश्यमर्यादा कमी असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढत आहे, महावितरणच्या नियमांनुसार मुख्य रस्त्यापासून सुरक्षित अंतर राखूनच वीज पोल उभारणी करणे बंधनकारक आहे. त्या संदर्भात नियमांचे पालन न झाल्याचे दिसून येते. 

सदरील कामाकडे महावितरण कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच किमान आता तरी महावितरण विभागाने व सदरील कंत्राटदार कंपनीने, सदरील बाबीची तात्काळ दखल घेऊन चौसाळा ते देवीबाभुळगाव या मार्गावरील वीज पोलचे पुनर्मापन करून ते महावितरणच्या नियमांप्रमाणे रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर स्थानांतरित करण्यात यावेत अन्यथा बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी