मुख्यमंत्र्यांकडून ‘जबाबदार आणि पर्यावरणपूरक खाण’चा संदेश; 193 कामगारांना नियुक्तीपत्रांचे वितरण
*गोव्यात खाणकामाचे 12 वर्षांनंतर पुनरुज्जीवन; काले खाण आणि कुडेगाळ प्लांट कार्यरत*
मुख्यमंत्र्यांकडून ‘जबाबदार आणि पर्यावरणपूरक खाण’चा संदेश; 193 कामगारांना नियुक्तीपत्रांचे वितरण
पणजी, 1 डिसेंबर 2025: गोवा सरकारने काले आयर्न ओर खाण आणि कुडेगाळ प्रोसेसिंग प्लांटमध्ये खाणकामाला अधिकृतरीत्या सुरुवात झाल्याची घोषणा केली. दोनापावला येथील आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेल्या कामगारांना नियुक्तीपत्रांचे वितरणही करण्यात आले. राज्यातील खाण उद्योगाला तब्बल बारा वर्षांनंतर नियमनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पुनरुज्जीवित करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
ऑपरेशनल रोलआउट अंतर्गत काले खाणीत 159 कामगार आणि कुडेगाळ प्रकल्पात 34 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. काले येथून उत्खनन होणारा लोखंडधातू पूर्णपणे कुदेगाळ येथे प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार असून, त्यामुळे राज्यातच एक एकसंध आणि समन्वित प्रणाली उभी राहणार आहे. ही प्रगती राज्यातील व्यापक खाण सुधारणा प्रयत्नांशी सुसंगत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ई-लिलाव आणि डंप लिलाव यांसारख्या उपाययोजनांमुळे अधिक जबाबदारी, पारदर्शकता आणि क्षेत्रातील स्थिरता सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “बारा वर्षांच्या अनिश्चिततेनंतर गोवा खाण क्षेत्रात स्थिर, शाश्वत आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम असे पुनरुज्जीवन पाहत आहे. प्रत्येक खाण आणि प्रक्रिया प्रकल्पात पारदर्शकता, जबाबदारी आणि पर्यावरणीय कर्तव्य पालन करणे ही आमची ठाम बांधिलकी आहे. खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी आणि स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यासाठी फोमेंतो ग्रुप आणि विशेषतः श्री. अवधूत तिंबलो यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
Comments
Post a Comment